Homeमुंबईकोण आहेत वाल्मिक कराड?

कोण आहेत वाल्मिक कराड?

Newsworldmarathi Mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास संतोष देशमुख हे चुलत भावासोबत कारने जात होते. या वेळी स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा जणांनी त्यांच्या गाडीला अडवून जबरदस्तीने त्यांचे अपहरण केले.

Advertisements

संतोष देशमुख हे केवळ एक युवा सरपंचच नव्हे, तर समाजासाठी कार्यशील व्यक्तिमत्व होते. त्यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात चर्चेत आलेले नाव म्हणजे वाल्मिक कराड.

वाल्मिक कराड हे महाराष्ट्रातील परळी मतदारसंघातील एक प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व आहेत. ते परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत आणि सध्या राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मागील दहा वर्षांपासून, परळी मतदारसंघातील प्रशासन आणि राजकीय कार्याचा मुख्य कारभार ते पाहत असल्याचे बोलले जाते.

परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून परळी नगरपालिकेचे कामकाज पाहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला झाल्यानंतर, ते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली काम करू लागले. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत, परळी मतदारसंघातील समस्या सोडविण्यात त्यांची भूमिका असते.

वाल्मिक कराड यांचे नाव आक्षेपार्ह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जोडले गेले आहे: 307 (खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा) यासारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात कराड यांचे नाव समोर आले आहे. केज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्याशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप केला जातो. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणानंतर, धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावरही जोरदार राजकीय टीका होत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी, हा प्रकरण राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचे काहींनी म्हटले आहे.

वाल्मिक कराड यांची ओळख परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नेते अशी आहे, परंतु त्यांचे नाव वारंवार गुन्हेगारी प्रकरणांत येत असल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्यावरून मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments