Newsworldmarathi Mumbai: एक-दोन नव्हे तर; शे-दोनशे उद्यानांच्या गर्दीत विसावलेल्या नवी मुंबई शहरात‘स्त्रीशक्ती’ च्या साथीने आणखी उद्यान बहरणार, फुलणार आहे.‘आरबीजी फाउंडेशन’ आणि या फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘चला उद्यान घडवू…उद्यान बहरू’ या वृक्षारोपणाच्या मोहिमेतून शंभर झाडे लावून, त्यांच्या संगोपनाचा निर्धार केला गेला. विशेष म्हणजे, या मोहिमेच्या शुभारंभाला नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या पत्नी रेवती शिंदे यांच्यासह महापालिकेतील धडाकेबाज महिला उपायुक्त
या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार केला.
सी-वूडसमधील स्व. बाळासाहेब तांडेल उद्यानात मधुरा गेठे यांनी राबविलेल्या वृक्षारोपणाच्या मोहिमेला नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त उद्यान विभागाच्या प्रमुख स्मिता काळे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर सहभागी झाल्या होत्या.
नवी मुंबई शहरात आजघडीला महापालिकेच्या माध्यमातून सुमारे पाचशे ठिकाणी छोटी उद्याने आणि झाडे लावून परिसर विकसित केला आहे. त्यातच, पामबिच रस्त्यालगत स्व. बाळासाहेब तांडेल उद्यान विकसित करण्यात येत आहे.
याच उद्यानाच सुमारे दोनशे झाडांचे रोपण करून त्यांचे जतन केले जाणार आहे. त्यासाठी ‘आरबीजी फाउंडेशन’ विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिचा शुभारंभ शुक्रवारी रेवती शिंदे यांच्या हस्ते झाला. तेव्हा, काळे, बाबर आणि म्हात्रे उपस्थित होत्या. या मोहिमेला शुभेच्छा देताना, रेवती शिंदे म्हणाल्या, ‘झाडांचे रोपण आणि त्यांची निगा राखण्यासाठी अशी मोहीम स्तुत्य आहे. तिचं नेहमी सहभाग ठेवू.’
काळे म्हणाल्या’, महापालिकेच्या उद्यानात वृक्षा
रोपणासाठी घेतला हा पुढाकार, शहराची शोभा वाढवेल.’’
‘प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक चिंताही वाढत आहे. अशा काळात आपण हिरवाई जपली पाहिजे. त्यामुळे वातावरण ताजेतवाने राहील, असे बाबर यांनी सांगितले.
उद्याने आणि त्यातील हिरवाई हे नवी मुंबई शहराचे सौंदर्य आहे. याच सौंदर्यामुळे आपले शहर आणखी बहरणार आहे. त्यामुळे हिरवाई जपली आणि वाढवावी लागणार आहे. या उद्देशाने ही मोहीम राबवली आहे.
मधुरा गेठे
अध्यक्षा, आरबीजी फाउंडेशन, नवी मुंबई.


Recent Comments