Newsworldmarathi Pune : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे इयत्ता सहावी साठी अथर्व सतिश नवले याची निवड झाली आहे.
भिगवण (ता. इंदापूर) येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिगवण येथे इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अथर्व सतिश नवले याची पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे येथे इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे. अथर्वने आपल्या अभ्यासातील गुणवत्ता, मेहनत आणि कौशल्य यामुळे ही यशस्वी घौडदौड केली आहे.
अथर्वच्या या उल्लेखनीय यशामागे शिक्षक सचिन गायकवाड व सुरेश माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अथर्वच्या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, केंद्रप्रमुख मनीषा दुर्गे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी गाडे आणि मुख्याध्यापक हनुमंत पानसरे यांनी त्याचे अभिनंदन केले असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अथर्वच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित असून, शाळेचा आणि परिसराचा गौरव वाढवणारे आहे.
Recent Comments