Homeपुणे५० शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

५० शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Newsworldmarathi Pune : पर्यावरण विषयक गाणी, कविता, चित्रकलेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश आणि प्रभावी नाट्य सादरीकरणातून पर्यावरण संवर्धनाचा जागर यातून आज पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी त्यांची पर्यावरण रक्षणाप्रती असलेली जागरूकता दाखवून दिली. निमित्त होते, वनराई संस्थेचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित वनराई इको क्लब पर्यावरण शिक्षण उपक्रमाचे. या उपक्रमात 50 शाळांमधील 400 विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लिट्ल चॅम्प फेम गायिका अंजली गायकवाड, वनराई चे विश्वस्त डॉ. रोहिदास मोरे. सागर धारिया, वनराईचे सचिव अमित वाडेकर, बबनराव कानकिरड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सागर धारिया म्हणाले, वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले आहे. आपण हे बदलेल चक्र ठीक करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. किमान आपल्या घरात येणाऱ्या पाण्याची बचत जरी केली तरी खूप मदत होईल. कारण छोट्या छोट्या गोष्टीच मोठे बदल घडवू शकतात.

डॉ. रोहिदास मोरे म्हणाले, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललेला आहे तो कमी करायचा असेल तर पर्यावरण सजग तरुण पिढी निर्माण होण्याची गरज आहे. डॉ. मोहन धारिया यांनी पर्यावरण जनजागृतीचे जे काम चाळीस वर्षापूर्वी सुरू केले ते आता देशभर सुरू आहे. यामध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हायचं आहे.

प्रास्ताविकपर भाषणात अमित वाडेकर म्हणाले, वनराई चे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांनी 40 वर्षा पूर्वी जे रोप लावले त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. शेकडो दुष्काळी गावांना त्याने दुष्काळ मुक्त केलं आहे. इको क्लबच्या माध्यमातून गेले 30 वर्ष पर्यावरण जनजागृती करत असून पर्यावरण शिक्षणाकडे आम्ही आता एक पाऊल पुढे टाकलेले आहे. पुढील काळात याची व्याप्ती वाढणार आहे.

लिट्ल चॅम्प फेम अंजली गायकवाड म्हणाली, पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणाऱ्या वनराई संस्थेच्या कार्यातून प्रेरणा मिळाली. पर्यावरण बद्दल आपण किती जागरूक राहील पाहिजे, किती काळजी घेतली गेली पाहिजे याची जाणीव होते. पर्यावरणा प्रमाणेच आरोग्याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. कारण आरोग्य हीच संपत्ती आहे. अलीकडे दुषित पाण्यामुळे जीबीएस नावाचा आजार होत आहे. त्यामुळे आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी किती काम करण्याची गरज आहे यांची जाणीव होते.

बबनराव कानकीराड यांच्यासह परीक्षक राहुल देवकाते, किशोर नलावडे, आणि डॉ. अश्विनी पटवर्धन मनोगत व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वनराई इको क्लबचे प्रकल्प संचालक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली वाघे यांनी केले. आभार सुजाता मुळे यांनी मानले.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments