Homeपुणेकॅब चालक संपावर जाणार

कॅब चालक संपावर जाणार

Newsworld Pune : ओला उबेर सारख्या ऑनलाईन कंपन्या पुणे RTO ने परवाना रद्द करून सुद्धा भारत सरकारच्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सोबत करारबद्ध असणाऱ्या एअरो मॉलमध्ये बेकायदा व्यवसाय करत आहेत.

Advertisements

शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे सदर कंपन्या प्रवाशांकडून अव्वा च्या सव्वा दरात भाडे वसूल करत असल्याचे अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले आहे. त्याचबरोबर सदर कंपन्या ड्रायव्हरला योग्य तो शासनमान्य मोबदला न देता मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. कंपन्यांच्या या नफेखोरी प्रवृत्तीमुळे प्रवासी व चालक दोघांची आर्थिक लूट होत आहे.

याबाबत वारंवार पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटी चे संचालक ढोके साहेब तसेच एरोमॉल चे व्हाईस प्रेसिडेंट रजपूत साहेब यांना तक्रार करून सुद्धा त्यांनी काहीच पावले न उचलल्यामुळे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पुणे एरोमॉल येथे तीव्र निदर्शने करण्यात येतील तसेच ऑनलाइन कॅब कंपन्यावर कॅब चालक व्यवसाय न करता प्रवाशांना डायरेक्ट सेवा प्रदान करतील.

याबाबत पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटी संचालक ढोके साहेब एरोमॉल व्हाईस प्रेसिडेंट रजपूत साहेब तसेच विमानतळ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असल्याची बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागरयांनी दिली

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments