Homeक्राईमतडीपार वाळू माफिया सुयोग सोळुंकेची दादागिरी; जिल्ह्यात येऊन मारहाण, गुन्हा दाखल

तडीपार वाळू माफिया सुयोग सोळुंकेची दादागिरी; जिल्ह्यात येऊन मारहाण, गुन्हा दाखल

Newsworldmarathi Jalna: जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा तडीपार वाळू माफियाच्या दहशतीचा प्रकार समोर आला आहे. मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे सख्खे मेहुणे आणि तडीपार वाळू माफिया म्हणून ओळखला जाणारा सुयोग सोळुंके याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करत जालन्यात येऊन एका तरुणास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील आपेगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात, शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी वाळू आणणाऱ्या एका इसमावर सुयोग सोळुंके याने लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून, मारहाण, धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुयोग सोळुंकेसह अन्य १० वाळू माफियांवर फेब्रुवारी महिन्यात बेकायदा वाळू उत्खनन, चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा अशा गंभीर आरोपांमुळे जालना, संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तडीपार असलेला सुयोग सोळुंके जिल्ह्यात येऊन पुन्हा गुन्हा करतो, ही बाब गंभीर मानली जात आहे.

दरम्यान, आरोपी अजूनही मोकाट असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित तरुण आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस प्रशासनाची कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments