Newsworldmarathi Pune: आई तुळजाभवानी प्रतिष्ठान, मा. नगरसेविका वर्षा साठे आणि ओबीसी अध्यक्ष भीमराव साठे यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव २०२५ चे औचित्य साधून रास दांडियाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
संध्याकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रंगीबेरंगी पोशाख, नृत्याची तालावर थिरकणारी तरुणाई आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दांडियाच्या उत्साहाने उजळून निघाला. महिलांनी आणि तरुणांनी पारंपरिक गार्बा व दांडियामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देवी आईची आरती पर्वती मतदारसंघाच्या रणरागिणी, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत करण दादा मिसाळही प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांचा सन्मान वर्षा साठे व भीमराव साठे यांनी केला. आरतीच्या वेळी वातावरणात भक्तिरस ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाला प्रशांत दिवेकर, प्रशांत थोपटे, मा. नगरसेविका दिपाली ओसवाल, अजयभाऊ भोकरे, विकास लवटे, संतोष लड्डा, मंदार रांजेकर, अरुणा पवार यांसह असंख्य मान्यवर उपस्थित राहिले. मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला व तरुणाई यांचा सहभाग लक्षणीय होता.


Recent Comments