Homeपुणेदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ करा : शिवराज मोरे

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ करा : शिवराज मोरे

Newsworldmarathi Pune: राज्यातील दुष्काळी व नैसर्गिक संकटग्रस्त परिस्थितीचा फटका बसलेल्या कुटुंबांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्यात यावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांचे शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली आहे.

Advertisements

या मागणीसंदर्भात मंडळाच्या सचिव मीनाक्षी राऊत यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. राज्यातील अनेक कुटुंबांना सध्याच्या परिस्थितीचा आर्थिक फटका बसला असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, यासाठी परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या विषयावर राज्य परीक्षा मंडळाशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येईल, असे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.

यावेळी शिवराज मोरे म्हणाले, “राज्यात जेव्हा-जेव्हा दुष्काळ किंवा गंभीर नैसर्गिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आजही अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त भार टाकणे योग्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे आणि ज्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते परत करावे. आर्थिक अडचणीमुळे एकाही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, ही आमची ठाम मागणी आहे.”

या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस महेश म्हेत्रे, विश्वजीत जाधव, प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव प्रियांका चौधरी, ॲड. अनंत दासा आणि नितीन आंधळे भाविक राका उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments