Newsworldmarathi Pune : पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून’जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,पुणे’असे करण्याचा शासकीय ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा नियम 110 अंतर्गत हा ठराव सादर केला,याला तातडीने मंजुरी मिळाली.
या ठरावाद्वारे केंद्र शासनाला विमानतळाच्या नाव बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. संत तुकाराम महाराज यांचे समाजासाठी असलेले योगदान आणि त्यांच्या विचारांचा वारसा लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात आले आहे. यामुळे विमानतळाचा स्थानिक, सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक संदर्भ अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.