Homeभारतद बेसिल किड्स अकॅडेमीचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

द बेसिल किड्स अकॅडेमीचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

पुणे : द बेसिल किड्स अकॅडेमीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांसह पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिगंबर दराडे आणि सी.ए. श्रीपाद वाईकर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासून आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देत बचत, नियोजन आणि जबाबदार सवयींचे धडे दिले. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि कठीण प्रसंगी खंबीर राहण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. संचालिका प्रीती साळुंके आणि अस्मिता पवार यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

Advertisements
Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments