Homeपुणेपीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन

पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन

Newaworldmarathi Pune: AI Summit दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील व इतर करार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे डेक्कन येथील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. “PM is Compromised” हा मुद्दा घेऊन युवक काँग्रेस देशभर आंदोलन करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Epstein फाइल्समधील कथित खुलासे, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख, तसेच संसदेत या विषयांवर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार देशहिताचे प्रश्न टाळत असून अमेरिकेसोबतच्या ट्रेड करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, AI Summit दरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेकांना ताब्यात (डिटेन) घेण्यात आले आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीब यांनाही अटक करून कोणतीही स्पष्ट कारणे न देता डिटेन केल्याचा आरोप करण्यात आला. अद्याप काही पदाधिकाऱ्यांची सुटका झालेली नसल्याचेही सांगण्यात आले.

हे आंदोलन महाराष्ट्राचे प्रभारी अजय चीकारा व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यानंतर सहप्रभारी शांभवी शुक्ला यांनी “PM कॉम्प्रमाईज आहेत हे देशाला कळण्यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण देशभर आंदोलन करेल,” असे सांगितले.

यावेळी सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले, विवेक कडू, कुणाल काळे, यश कोलते, अक्षय नवगिरे, ऋषिकेश थोरात, सागर धाडवे, आनंद दुबे, सद्दाम शेख, निखिल मलके, रमेश सातपोते, निखिल मलके, मेघशाम धर्मावत, प्रदीप मेहकरे, विकास सुपणर, चैतन्य जयभाये, स्वप्नील बनसोडे, रोहित पाटोळे, स्वरूप केदारी, वीरधवल गाडे, गणेश सहाणे, औदुंबर आगलावे, स्वप्नील शेलार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून देशहिताला तिलांजली दिल्याचा गंभीर प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे. संसदेत चर्चा न करता मुद्दे दडपले जात आहेत. जनतेच्या हितासाठी आम्ही आंदोलन केले; मात्र शांततेत आंदोलन करूनही आमच्या पदाधिकाऱ्यांना डिटेन करणे हे लोकशाहीविरोधी आहे.

प्रथमेश आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे. सरकार उत्तर देण्याऐवजी दडपशाही करत आहे.”“सत्य बाहेर येईपर्यंत युवक काँग्रेस आंदोलन सुरू ठेवेल.

सौरभ आमराळे,शहराध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेस

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments