Newaworldmarathi Pune: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेज आयोजित डॉ.रा.ना.दांडेकर चषक संस्कृत एकांकिका स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेला सांघिक प्रथम क्रमांक प्राप्त झाला. संस्कृत एकांकिकेचे नाव धैर्यं हि महतां धनम् असे होते.
यामध्ये प्रशालेतील एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या संस्कृत एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन संस्कृत विभाग प्रमुख वर्षा गानू यांनी केले होते.अमोघ कुलकर्णी या सहावीतील विद्यार्थ्याला अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. यामध्ये रुद्र बाभुळगांवकर ,अरुष बुद्धिहाळ अवनीश जवळेकर, रुद्र लंबाडे सोहम बागवे, अर्णव देशपांडे, हेरंब कुंभार या विद्यार्थ्यांनी तसेच सहावीतील दहा विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनय केला.
प्रशालेतील नाट्य छंद विभागाचे प्रमुख रवींद्र सातपुते यांनी प्रकाशयोजना व नाटकातील सर्व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे यांनी नैपथ्य व रंगभूषेसाठी सहकार्य केले. संस्कृत शिक्षिका प्रज्ञा करडखेडकर, शितल चौधरी यांचे देखील सहकार्य लाभले.माजी विद्यार्थी ईशान जबडे, आयुष दुसाने, रितेश भरडे या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. नववीतील विद्यार्थी वरद धारणे, कृष्णा कुलकर्णी यांनी नाटकाचे संगीत संयोजन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांनी या नाट्यसंघाला विशेष प्रोत्साहन दिले.



Recent Comments