Newsworldmarathi Pune : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची त्याच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी विविध विषयावर चर्चा झाली.
मंत्री रावल हे दोन दिवसापासून पुणे दौऱ्यावर आहेत. पणन संचालनालय, महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या कार्यालयात आढावा बैठक व अन्य शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच रावल आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे कौटुंबिक संबंध असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी ताईंनी श्री. रावल यांचे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


Recent Comments