Homeक्राईमपुणे- नाशिक महामार्गवरील अपघातात 9 जण जागीच ठार

पुणे- नाशिक महामार्गवरील अपघातात 9 जण जागीच ठार

Newsworldmarathi Pune : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ घडलेला हा भीषण अपघात अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. या घटनेत चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, ज्यामुळे जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करता आले.

Advertisements

जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली.

यामुळे मॅक्स ऑटो ही चेंडूप्रमाणे हवेत फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्या एसटीवर जाऊन मॅक्स ऑटो आदळली. या अपघातात आयशर आणि मॅक्स ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

या घटनेचे कारण नेमके काय होते याबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण महामार्गावरील वाहतुकीची नियमबाह्य पद्धत आणि अतिवेग यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा दुर्दैवी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना आणि वाहनचालकांकडून सावधगिरीची गरज आहे.

मयत नावे पुढील प्रमाणे
1) देबुबाई दामू टाकळकर वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2)विनोद केरूभाऊ रोकडे 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
3)युवराज महादेव वाव्हळ वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
5)गीता बाबुराव गवारे वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
6)भाऊ रभाजी बडे वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
7)नजमा अहमद हनीफ शेख वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर
8)वशिफा वशिम इनामदार वय 5 वर्ष
9)मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments