Homeपुणेडॉ. राजेश रसाळ यांच्या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. राजेश रसाळ यांच्या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

Newsworldmarathi Pune : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख मुले व मुली यांची मोफत नेत्र तपासणी, औषधोपचार शिबिर, ॲम्बुलन्सचे उद्घाटन आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र रसाळ यांच्या “समकालीन हिंदी कविता में सामाजिक एवं राजनैतिक व्यंग्य” या पुस्तकाचा प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी आमदार चेतन तुपे, सुरेश अण्णा घुले, शहरअध्यक्ष दिपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजेश रसाळ यांनी आपल्या मनोगतात सदर पुस्तक लिहिण्यासाठी जी काही प्रेरणा भेटली ती माझ्या आईकडूनच भेटली. माझी आई ही अतिशय शिस्तबद्ध व प्रेमळ स्वभावाची होती त्यामुळेच मी माझ्या पुस्तकाचे समर्पण माझ्या आईच्या चरणी केले आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन हे कडक शिस्तीसाठी, आणि तरुणांची आवडती राजकीय व्यक्ती असलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते व्हावे. ही माझी मनोमन इच्छा होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन ही बाब मला जास्त अभिमानास्पद वाटते, असे रसाळ म्हणाले.

यावेळी डॉ शंतनू जगदाळे, अजित दूधभाते, प्रदीप देशमुख, अजित घुले, संदीप नाना तुपे, खलाटे सर, संदीप बधे, अमर आबा तुपे, शिवाजी डोंबे, वैष्णवी सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments