Newsworldmarathi Pune : जोपर्यंत संघर्षाचे मोल कळत नाही तोपर्यंत आयुष्य घडत नाही. त्यामुळे आपल्या मुलांना सगळे काही आयते मिळू देऊ नका. इन्स्टा व्हिडिओ बघून यश मिळत नसते. कष्टातून, संघर्षातूनच आयुष्याला खरा आकार मिळतो हे कायम लक्षात ठेवा असे प्रभावी भाषण करून पोलीस अधिकारी विश्वासराव नांगरे पाटील यांनी जिंकली पुणेकरांची मने जिंकली
चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐश्वर्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पर्वानिमित्त अण्णाभाऊ साठे सभागृहात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आयुष्यात इच्छाशक्ती असेल आणि त्यांना प्रयत्नांची जोड दिली तर अशक्य असे काहीच नाही. वयाच्या १६ व्या वर्षी सवंगड्यांना घेऊन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. या वयात मेंदू विकसित होत असतो पण चांगले-वाईट यातील भेद कळत नसतो. त्यामुळे या काळातच मुलांना जपायला हवे. स्वप्न सत्यात उतरवायची तर कसून प्रयत्न करावे लागतील हे कायम लक्षात ठेवा.
या प्रसंगी विजयशेठ जगताप, अभय मांढरे, पारस मलजी मोदी, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेविका राणी भोसले, अश्विनी भागवत, रूपाली ठोंबरे, गौरी जाधव, प्रदीप देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, विलासराव भणगे, नेमीचंद सोळंकी, शंकरराव कडू, युवराज रेणुसे, अॅड. दिलीप जगताप, सचिन डिंबळे, सर्जेराव शिळीमकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या साहिल मरगजे, स्वप्ना कुंभार, आलोक तोडकर आणि आदर्श फलफले या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वरिष्ठ पत्रकार पराग पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. दिलीप जगताप यांनी आभार मानले. श्रावणी देशमुख व अक्षय लिमन यांनी पसायदान सादर केले.


Recent Comments