Homeपुणेउद्योजकतेला प्रोत्साहन देणारे 'एमईए एक्झिबिशन २०२५' शनिवारपासून

उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ शनिवारपासून

Newsworldmarathi Pune : व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, याउद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ व २ मार्च २०२५ रोजी महालक्ष्मी लॉन्स, डीपी रस्ता, कर्वेनगर येथे हे प्रदर्शन होत असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला सचिव राजेश कुराडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कमिटी मेंबर सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव आदी उपस्थित होते.

बांधकाम, वित्त, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर्स, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्रियल, आॅटोमोबाईल, एफएमसीजी, अ‍ॅर्व्हटायझिंग, ऊर्जा, सौंदर्य, फॅशन, आयटी, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर, फायनान्स यांसह गृहसजावटीपासून प्रवासापर्यंत आणि सौंदयार्पासून वित्तव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रातील सेवा व उत्पादने एकाच छताखाली पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योजक यामध्ये सहभागी होत आहेत.

नवीन व्यवसायाच्या संधी, उत्पादने व सेवांचे स्टार्टअप्स, व्यवसायवृद्धीचे नवे पर्याय, दर्जेदार उत्पादनांची खरेदी व माहिती अशी अनेक उद्दिष्टे येथे साध्य होणार आहेत. दिनांक १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम , पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अजित निंबाळकर तसेच प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन उपस्थित राहणार आहेत. व त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता फ्लूट अँड फिडल हा श्रुती भावे आणि अमर ओक यांचा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हॉटेल संदीप चे संदीप कोतकर यांनी या सांगीतिक कार्यक्रमाला सहकार्य केले आहे. दोन्ही दिवस खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स तसेच लहान मुलांसाठी प्ले एरिया देखील उपलब्ध असणार आहे.

रविवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता भीमथडी च्या संस्थापक सुनंदा पवार यांना एमईए चे आयकॉन म्हणून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एमईए प्राईड हा पुरस्कार तेजराज पाटील यांना देण्यात येणार आहे. तसेच विविध पुरस्कारांचे वितरण केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दोन्ही कार्यक्रम आणि एमईए एक्झिबिशन २०२५ सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments