Homeपुणेओपन हाऊस निमित्त पुणेकरांनी जाणून घेतला ‘फ्रीमेसनरी’ समुदायाचा इतिहास

ओपन हाऊस निमित्त पुणेकरांनी जाणून घेतला ‘फ्रीमेसनरी’ समुदायाचा इतिहास

Newsworldmarathi Pune : कॅम्प भागातील फ्रीमेसन्स हॉल आज सर्वसामान्य नागरिकांसाठी उघडला गेला होता. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील नागरिकांनी “ओपन हाऊस” कार्यक्रमाचा लाभ घेतला. मॅसोनिक लॉजेस ही एक अशी संघटना आहे जी त्या पुरुषांची असते जे एक सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवतात आणि आत्मसुधारणेसाठी चिंतन करण्याची इच्छा बाळगतात. फ्रीमेसनरीच्या विविध पैलूंवर लेस्ली विल्सन लॉजच्या सदस्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यानंतर एक प्रश्नोत्तर सत्र पार पडले, ज्यामध्ये फ्रीमेसनरीबाबत उपस्थितांच्या शंका दूर करण्यात आल्या.

इंग्लंडच्या युनायटेड ग्रँड लॉजच्या अंतर्गत दी लेस्ली विल्सन लॉज नं ४४८० यांच्या वतीने सदर ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले  होते. कार्यक्रमाच्या दरम्यान एक मोफत डोळ्यांची तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते, ज्याचा नागरिकांनी लाभ घेतला.

फ्रीमेसनरीचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे आणि त्याचे लेखी पुरावे मागील ५०० वर्षांहून अधिक काळ उपलब्ध आहेत. अमेरिकेचे अनेक राष्ट्रपती, राजे व राजघराणे तसेच जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वे जसे जॉर्ज वॉशिंग्टन, मोझार्ट, सर विंस्टन चर्चिल, मार्क ट्वेन हे सर्व फ्रीमेसन होते. तसेच भारतातील अनेक मोठे उद्योजक, व्यवसायिक, व्यवस्थापकीय संचालक, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, डॉक्टर, वकील आणि उच्च दर्जावर कार्यरत अधिकारी,  व्यावसायिक यांचा या समुदायामध्ये समावेश आहे. काही प्रसिद्ध भारतीय फ्रीमेसन्समध्ये स्वामी विवेकानंद, फिरोजशाह मेहता, पंडित मोतीलाल नेहरू, सर दोराबजी जमशेदजी टाटा, डॉ. सी. राजगोपालाचारी, सर सुलतान मोहम्मद शाह आगा खान, महाराजा दुलीप सिंग, महाराजा जिवाजी राव सिंदिया, अभिनेते डेव्हिड अब्राहाम, क्रिकेटपटु मन्सुर अली खान पतौडी यांचा समावेश होतो.

फ्रीमेसनरीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, कृपया www.dglbombay.in या वेबसाइटला भेट द्या.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments