Newsworldmarathi Pune : दिलीप वेडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर कला, साहित्य, संगीत आणि विचारांना चालना देणारा एक भव्य उपक्रम ठरला आहे. त्यांनी नवोदित कलाकारांना संधी दिली, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आणि या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक बळ दिले असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, बावधन, एल. एम. डी. चौक, पुणे येथे आयोजित बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार प्रदान महोत्सवात ‘बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार सुनेत्रा अजितदादा पवार, सरसंघचालक रवींद्र वंजारवाडकर, खासदार मेधा कुलकर्णी, तसेच मा. नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहळ यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते प्रवीण तरडे, तालयोगी तबलावादक पं. सुरेश तळवलकर, महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहळ, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांना देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना भाऊ तोरसेकर आणि प्रवीण तरडे यांनी महोत्सवाच्या भव्य आयोजनाचे विशेष कौतुक केले.
संयोजक दिलीप वेडेपाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. महोत्सवाच्या आयोजनात चेलाराम हॉस्पिटल, आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज, सुराणा संघवी कन्स्ट्रक्शन्स, वाईस कंस्ट्रक्शन, न्याती कन्स्ट्रक्शन्स आणि के पुणे यांचा मोलाचा सहभाग होता.
यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकरभाऊ मांडेकर, तसेच ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments