Newsworldmarathi Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ट्रॉफी जिंकण्यासाठी महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा ऐतिहासिक सामना खेळवला जात आहे. गट टप्प्यातील सामन्यांनंतर हे दोन्ही आता दुसऱ्यांदा अंतिम फेरीत भिडणार आहे. याआधी भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर हे दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.
Recent Comments