Newsworldmarathi Mumbai : राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील. अजित पवार हे 11 व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून आले. राज्याच्या तिजोरीची गंभीर स्थिती असल्याची चर्चा सुरू आहे. एका बाजूला आर्थिक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रिय घोषणा यामध्ये अर्थमंत्री अजित पवार कसा समतोल राखणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आले.त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील अर्थ संकल्प हा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा असल्याने त्यावेळी अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. मात्र, त्याचा भार सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर पडला.


Recent Comments