Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता सासरे होणार आहे. अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऋतुजा पाटील या पवार घराण्याच्या सून होणार आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचा फोटो शेअर करून माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पवार घरात सनईचे सूर घुमणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. जय पवार तसे राजकारणापासून दूरच राहिले आहे. उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे. काही वर्षे दुबईत त्यांनी व्यवसाय केल्याचं सांगितलं जातं. परंतु गेले काही वर्षे ते मुंबई आणि बारामतीतच असतात. सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचं सांगितलं जातं. त्यांचं लग्न हे ऋतुजा पाटील यांच्याशी ठरलं आहे.


Recent Comments