Newsworldmarathi Pune : पुणे जिल्हा परिषदेच्या दालनात भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाटला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदाराच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागितलेल्या पैशाने त्यांचा कारभार लाच लुचपत विभागाने अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
एक वरिष्ठ त्यानंतर त्याचा कनिष्ठ आणि तिसरी त्यांची महिला इंजिनीयरचा यात समावेश आहे. बुधवार दि १३ रोजी सायंकाळी दरम्यान हा प्रकार जिल्हा परिषदेच्या दालनांत घडल्याने विकासाच्या नावाखाली अधिकारी लूट कोणत्या मार्गाने करतात याचा हा भक्कम पुरावा मिळाला आहे.होळी सणाच्या मुहूर्ता वर भ्रष्ट कारभाराची बोंबा-बोंबच या निमित्ताने झालेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यातील गलांडवाडी गाव येथील एका विकास कामाचे टेंडर तक्रारदार प्रवीण शिवाजी कदम यांनी घेतलेले होते चाळीस लाखाचे त्यांचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येणे होते हे बिल काढण्यासाठी या तीन अधिकाऱ्यांनी टक्केवारी प्रमाणे पैशाची मागणी केली होती अखेर तडजोड करायची म्हणून ७८ हजार रुपये देऊन बिल काढण्याचा फार्मूला ठरला आणि हाच फार्मूला या बिल काढण्याच्या भानगडीने उघड झाला आहे.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला अगोदरच कळविले होते ठरल्याप्रमाणे हा सापळा रचण्यात आला आणि संध्याकाळी होळी पेटण्याच्या टायमालाच भ्रष्टाचाराची ही बोंबाबोंब विभागाने उघड केली आणि मोठी बोंबाबोंब झाली आहे .
जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी सामाजिक विकास कामांसाठी मोठा निधी खर्च केला जातो यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाणी विभाग जलसंधारण छोटे पाटबंधारे एकात्मिक बाल विकास अशा विविध स्वरूपाने छोट्या छोट्या विभागातून कोट्यावधी रुपयांचा सामाजिक कामे करण्यासाठी निधी खर्च केला जातो सामाजिक कामे करण्यासाठी या प्रत्येक विभागातून ठेकेदारी स्वरूपाने कामे करण्यासाठी सुरुवातीला ठेका तयार करण्याचे प्रोसेस केले जाते याला गोंडस नाव टेंडर असे म्हणतात.
हे टेंडर सुद्धा या विभागातून मॅनेज करण्याचा प्रताप केला जात आहे हे सर्वश्रुत असताना सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी ऐकून बहिरे दिसून आंधळे अशी भूमिका बजावत असतात याचा विपरीत परिणाम या प्रकाराने उघडा झालेला आहे.
ठेकेदारी ही राजकीय आशीर्वादात केली जात असली तरी ती अधिकाऱ्यांच्या टक्केवारीची गुलाम बनलेली असते टक्केवारीच्या वसुली शिवाय अधिकाऱ्यांकडून कुठल्याही स्वरूपाची कागदी कारवाई पूर्ण केली जात नाही आणि म्हणून देणे-घेणे हे नित्याचेच इथे ठरलेले असते आणि हा सर्व प्रकार कार्यालय सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत केला जातो आज खऱ्या अर्थाने होळी सण आहे.
होळी पारंपारिक सण असून होळीच्या कडेने बोंबाबोंब करीत गावामध्ये ती साजरी केली जाते आज जिल्हा परिषदेमध्ये ही होळी भ्रष्टाचाराला पकडले म्हणून बोंबाबोंब करून झालेली आहे असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने जिल्हा परिषदेमध्ये मोठा सावळा गोंधळ असून भ्रष्टाचाराचे आगारच आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
दोन व्यक्ती आणि एक महिला अधिकारी एकाच वेळी जाळ्यात पकडण्याची ही किमया लाच लुचपत विभागाला करण्यासाठी गेले पाच दिवस झगडावे लागलेले आहे गेले पाच दिवसापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून होळीच्या मुहूर्ता वरती तिला अंतिम स्वरूप मिळाले आहे.
लाचलुचपत विभागाने अशा स्वरूपाची कारवाई प्रथमच केलेली नसून राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अनेक कार्यालयातून अशा स्वरूपाच्या मागील काळात घटना घडलेल्या आहेत पण या या घटनांचा अखेर आणि शेवट काय झाला हे मात्र सविस्तर रित्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे एखाद्या लाचलुचपत विभागात सापडलेल्या अधिकाऱ्यांची कारवाई ही शेवटच्या क्षणी काय झाली याची माहिती सुद्धा प्रसारमाध्यमातून मिळावी अशा स्वरूपाची मागणी या कारभाराच्या प्रश्नाकडे पाहून जनसामान्यात होणे साहजिकच आहे


Recent Comments