Newsworldmarathi Pune: जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ व आदर्श महिला पुरस्कार देण्यात आले. हॉटेल ऋतुगंध येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या रूपाली ठोंबरे-पाटील व सामाजिक कार्यकर्त्या आरती जमदाडे-साठे उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका व आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा अनुपमा जाधव-कुसाळकर, सुषमा भालेकर, वर्षा कुदळे, अपर्णा दुबे, राधा पांगारे, प्रीती विचारे, गीता गाटूळे, अंजली रानडे, पल्लवी शिंदे, सिद्धिका जाधव, दंताळे ज्वेलर्सचे क्षितीज दंताळे, राधिका जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्या महिलांचा यावेळी मान्यवरांची उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Recent Comments