Homeक्राईमPune Accident: पुण्यात भीषण दुर्घटना ! ट्रॅव्हलरला आग लागून चार जणांचा...

Pune Accident: पुण्यात भीषण दुर्घटना ! ट्रॅव्हलरला आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू

Newsworldmarathi Pune : हिंजवडी फेज 1 मध्ये आज (दि. 19 मार्च) सकाळी भीषण अपघात घडला. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर टेम्पोला अचानक आग लागली. या दुर्घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळी सुमारे ८ वाजता टेम्पो हिंजवडी फेज वनमध्ये जात असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच चालक आणि समोरील कर्मचारी गाडीतून तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता आला नाही, त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

या घटनेत इतर काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी. तसेच, गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments