HomeपुणेPune News : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Pune News : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Newsworldmarathi Pune : अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 चा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ अर्थतज्ञ डॉ.विजय केळकर यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच जखमी झालेल्या जवानांना आणि विरमातांना देखील यावेळी गौरवण्यात येणार असल्याची माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देसाई यांनी दिली.

पुण्या भूषण पुरस्काराचे यंदाचे सदस्य वर्ष आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक पुरस्कार भव्य उपक्रम राबवले जातात. स्मृतीचिन्ह आणि दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा देखील लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुण्यभूषण संस्थेने याआधी महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी,  व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी,  शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व क्रिकेटपटू कपिल देव आणि सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार,  वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदुचे संपादन एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशिलकुमार शिंदे,  सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, विकास आमटे, आशा भोसले,  शरद यादव,  नितीन गडकरी,  पं.हरिप्रसाद चौरासिया, पं. अमजद अली खान, पं. शिवकुमार शर्मा,  प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, पद्मविभूषण नारायण मूर्ती आदी मान्यवरांनी नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments