Newsworldmarathi Pune: नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सपिका पथ, काशेवाडी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य ‘होम मिनिस्टर – सौभाग्यवतींचा’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांसाठी चारचाकी गाडीचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रात प्रथमच ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात चारचाकी गाडीचे बक्षीस देण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला. या अनोख्या बक्षिसामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. हजारो माता-भगिनींच्या उपस्थितीत संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमातील प्रथम पारितोषिकाची मानकरी अश्विनी किशोर खुडे ठरल्या. त्यांना चारचाकी गाडी बक्षीस म्हणून मिळाली. हे पारितोषिक जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या आनंदात सहभागी होत उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या आनंदाला आणि उत्साहाला प्रोत्साहन देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
चारचाकी गाडीबरोबरच महिलांसाठी फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी यांसह अनेक आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. मनोरंजन, आनंद आणि बक्षिसांची मेजवानी यामुळे कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या सोहळ्याला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, माजी आमदार जगदीशजी मुळीक, माजी महापौर अंकुश काकडे, बाबासाहेब धाबेकर, महेश पुंडे, नगरसेविका कालिंदा पुंडे, गणेश यादव, राहुल भंडारे, भरत कांबळे, लहुजी क्रांती सेनेचे प्रमुख विष्णू भाऊ कसबे, माजी आरपीआय शहर प्रमुख महेंद्र कांबळे, संदीप दांदोरें, अशोक शिरोळे, अनिल दामजी, हरीश लडकत आणि दिनेश रासकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून प्रेम, आशीर्वाद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अर्चना तुषार पाटील यांनी सर्व माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
वाढदिवसाचा आनंद जनतेसोबत साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि आनंदाचे क्षण निर्माण करणे, हाच आपल्यासाठी खरा आनंद असल्याची भावना अर्चना पाटील यांनी व्यक्त केली. जनतेच्या प्रेमातून आणि आशीर्वादातून जनसेवेचा हा प्रवास असाच अविरत सुरू ठेवण्याचा निर्धारही अर्चना पाटील यांनी व्यक्त केला.


Recent Comments