Newsworldmarathi Pune: द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा यांनी संयुक्त रित्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात 450 दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळी शिधा वाटप करण्यात आले.
द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या नांदेड फाटा,सिंहगड रस्ता येथील शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहर व परीसरातील दृष्टीबाधित व्यक्तीं आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
याप्रसंगी द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश शहा तसेच कार्यकारी संचालक श्री परवेझ बिलीमोरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब पुणे शनिवार वाडाचे प्रेसिडेंट श्री दिनेश जोशी,प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. श्रीनिवास पाळंदे ,श्री नारायण चांडक,अभिनव सेवा फौंडेशनचे श्री सुनील गोवर्धन उपस्थित होते.काश्मिरा ठाकर व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
दृष्टीबाधित व्यक्तींची ‘दिवाळी’ आनंदाची व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे नियमितपणे हा उपक्रम राबविला जात आहे.
द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था गेली 1952 पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे.महाराष्ट्र तसेच भारतामधील अनेक दृष्टिहीन व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.


Recent Comments