HomeपुणेNirmala Navale Interview! या सरपंच मॅडम हिरोइनला पडतात भारी...कोण आहे निर्मला नवले?..वाचा...

Nirmala Navale Interview! या सरपंच मॅडम हिरोइनला पडतात भारी…कोण आहे निर्मला नवले?..वाचा खास मुलाखत

Newsworldmarathi Team : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले या त्यांच्या सामाजिक कार्य आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे चर्चेत आहेत. वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला. निर्मला नवले यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व यामुळे त्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांच्याशी आमच्या न्यूजवर्ल्ड मराठीच्या टीम ने केलेली ही खास बातचीत

Oplus_131072

राजकारणात सुरुवात कशी झाली?
“मी आयटी इंजीनिअर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. माझे वडील भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते. त्यांनी 28 वर्ष देशाची सेवा केली. त्यामुळे समाजसेवेची आवड मला पहिल्यापासूनच होती. परंतु, लग्नानंतर माझे पती शुभम यांनी मला कार्य करण्याची प्रेरणा दिली. माझ्या सरपंचपदाच्या काळात गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले, त्या काळात ते माझ्यासोबत उभे राहिले. ते नेमही म्हणतात समजासेवा ही एक जबाबदारी नाही, तर ती एक लोकांसाठी संधी आहे. तुला मिळालेला संधीचा उपयोग हा लोकांसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल? त्या दृष्टीने काम कर”, असंही निर्मला नवले म्हणाल्या.

Oplus_131072

आयटी इंजीनिअर असतानाही राजकारणात एन्ट्री का केली?
मी हा विचार कधीच केला नव्हता. एक इंजीनिअर म्हणून चांगल्या कंपनीत जॉब मिळवायचा आणि काम करायचं, असाच निर्णय होता. परंतु, हे वेगळं फिल्ड आहे. मला लोकांसाठी काम करायची आवड पहिल्यापासूनच होती. मी या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही

Oplus_131072

सोशल मीडियाच्या ट्रॉलिंग कडे तुम्ही कसं बघता?
समाजामध्ये काम करत असताना विरोध हा होत असतो. आणि जे लोक वाईट कमेंट करतात त्यातून त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते. त्यांचं कर्तुत्व काय असतं हे कोणालाच माहीत नसतं त्यामुळे मी त्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही.

सामाजिक कार्य करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा असतो?
राजकारणाबद्दल एक भीती मनात होती पण मी माझे विचार घरच्यांना आणि माझे पती शुभम यांना सांगितले. मला राजकारणामध्ये काम करायचा आहे आणि यामुळे घरच्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि पहिल्यांदा सरपंच पदाचा फॉर्म मी घरच्यांसोबतच भरला.

Oplus_131072

ग्रामपंचायतमध्ये काम करताना कामाचा अनुभव कसा आहे?
ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना हा सगळा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. माझ्या माहेरी आणि सासरी कोणताही राजकीय वारसा नसल्यामुळे मी कधीही राजकीय सभा किंवा कुठली मीटिंग बघितली नव्हती. पण खूप गोष्टी समजून घेऊन मी खूप गोष्टी मला यातून शिकायला मिळाल्या. सरपंच म्हणून अनेक ठिकाणी जावं लागतं योजना मंजूर करून आणाव्या लागतात ह्या गोष्टी मी नव्याने शिकले. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावांमध्ये अनेक विकास कामे केली.

Oplus_131072

सरपंच म्हणून काम करत असताना कोणती अशी गोष्ट आहे जी मनाला खूप आनंद देते?
कारेगाव ग्रामपंचायतमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मी नळ पाणीपुरवठा योजना राबवून गावा मधील पाण्याची समस्या सोडवली याचा मला खूप आनंद वाटतो. तसेच एआय टेक्नॉलॉजी चा वापर करून मी गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आणि स्पीकर देखील लावले आहेत तर त्या स्पीकर वरती रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा लावली जाते आणि यामुळे ग्रामस्थांना खूप चांगलं वाटतं.

आमदार खासदारकी पेक्षा गावातलं राजकारण वेगळं असतं याचा कसा अनुभव आहे?
काम करताना अनेक गाडी अडचणी येतात पण मी त्याकडे एक संधी म्हणून पाहते. मी कोणताही काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार स्मरणात ठेवून काम करते. योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची ताकत असेल तर यश हे नक्की मिळते.

Oplus_131072

महिलांनी राजकारणात यावं का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
महिलांनी राजकारणात येणं हे खूप महत्त्वाचा आहे आणि महिलांनी महिलांसाठी राजकारणात आलं पाहिजे. कारण महिलांना महिलांच्या समस्या या अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात त्या सोडवण्यासाठी महिला चांगले प्रयत्न करू शकतात. महिलाही घर उत्तम प्रकारे सांभाळते त्यामुळे ते देशही चांगल्या प्रकारे चालू शकते असं मला वाटतं त्यामुळे महिलांनी राजकारणात आलं पाहिजे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments