Homeपुणेविश्वशांती व विश्वकल्याणासाठी बुधवारी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण

विश्वशांती व विश्वकल्याणासाठी बुधवारी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण

Newsworldmarathi Pune : धर्म, जात, पंथ यांच्या सीमा ओलांडून भारतासह 108 देशांमधील नागरिक विश्वशांती आणि विश्वकल्याणाठी विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करणार आहेत. करोडो लोकांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 7:02 ते 9:36 या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, प्रविण चोरबेले, अभिजित डुंगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अनिल भंसाळी, ॲड. विशाल शिंगवी उपस्थित होते. दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सहभाग असणार आहे.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) माध्यमातून पुणे येथील एस. पी. कॉलेज ग्राउंड, टिळक रोड येथे विश्व नवकार महामंत्र दिवसा निमित्त नवकार महामंत्राचा जप केला जाणार आहे. पुणे येथे आयोजित उपक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार चंद्रकांत पाटील, नामदार माधुरी मिसाळ तसेच पुण्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे.

सध्याच्या काळात संपूर्ण जगात अशांती, हिंसा आणि अराजक माजलेले दिसते. यातूनच सर्वत्र नकारात्मक उर्जेचा प्रभावही वाढत आहे. अशा अस्थिर काळात मनाला शांती देणारा प्रभावी महामंत्र म्हणजे नवकार मंत्र. या मंत्राच्या एकाच वेळी जगभरात होणाऱ्या स्मरण आणि पठणाने सकारात्मक उर्जेची निर्मिती होऊन प्रत्येक प्राणिमात्रात शांती, अहिंसा, सदाचाराची भावना रुजवली जाईल.

68 अक्षरांच्या या मंत्राचे पठण शरणागत भावाने एकाच वेळी करोडोंच्या संख्येने केले गेल्यास विश्वशांती आणि विश्वकल्याण होण्यास नक्कीच मदत होईल हे लक्षात घेऊन या अद्वितिय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे इंद्रकुमार छाजेड यांनी सांगितले.

विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे माहात्म्य जाणून देश-विदेशातील अनेक धार्मिक गुरू, राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर त्या त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या साठी 100पेक्षा अधिक अनुष्ठान असणार असून सहा हजारांपेक्षा अधिक ठिकाणांहून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दिनेश ओसवाल यांनी दिली.

नवकार महामंत्राच्या सामूहिक पठणाने संपूर्ण विश्वात शांतता प्रस्थापित होण्यास, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उर्जा निर्माण होण्यास मदत होणार आहे. नवकार महामंत्राच्या सामूहिक पठणाने जागतिक विक्रम प्रस्थापित होईल. नवकार महामंत्र पठण कुठल्याही जाती, धर्म, व्यक्तीशी निगडित नसून याद्वारे ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ गुणांना वंदन केले जाते, असे लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले.

सामूहिक नवकार महामंत्र पठणाच्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि विश्वशांती व विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन प्रविण चोरबेले यांनी केले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 15 हजारांहून अधिक पुणेकरांनी नाव नोंदणी केली आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments