Homeपुणेइक्रम खान कुटुंबाची तिसरी पिढी साजरी करते रामनवमी उत्सव

इक्रम खान कुटुंबाची तिसरी पिढी साजरी करते रामनवमी उत्सव

Newsworldmarathi Pune : रामनवमी उत्सव देशभरात विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला .पुण्यातील रामवाडी येथील रामनवमी उत्सव मात्र इक्रम खान यांच्यामुळे चर्चेत आला आहे .इक्रम खान हे दरवर्षी रामनवमी उत्सवात सहभागी होऊन वर्षानुवर्षे साजरी करीत आहेत .इक्रम खान यांचे आजोबा व मुसा खान त्यांनतर त्यांचे वडील इसा खान हे दरवर्षी रामवाडी येथील राम मंदिराच्या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन सर्व प्रकारच्या मदतीने या उत्सवाचा प्रमुख भाग बनत आहेत .तीच परंपरा पूना गोल्फ क्लब चे कप्तान आणि उद्योजक इक्रम खान यांनी पुढे चालवली आहे .

Advertisements

सध्या देशाला सर्वधर्म समभावाच्या विचाराची गरज असताना खान कुटुंबाने मात्र १९३२ सालापासून रामनवमी उत्सव साजरा करून आणि त्यात हिरारीने सहभाग घेऊन समाजापुढे फार मोठा आदर्श निर्माण केल्याची भावना स्थानिक रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे .खान कुटुंबाच्या या कार्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे .आणि अशीच अपेक्षा सर्व धर्मातील बांधवाकडून व्यक्त केली जात आहे .यावेळी विजय गलांडे ,तोलेस्वर देवकर प्रमोद देवकर,संतोष देवकर सह राम मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते .

Advertisements
Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments