Newsworldmarathi Pune: विमाननगर परिसरातील प्रार्थना आणि सृष्टी यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी गणपतीची आकर्षक आणि सुंदर सजावट स्वतःच्या कल्पकतेने साकारली आहे. विशेष म्हणजे या सजावटीसाठी त्यांनी स्वतः मेहनत घेत विविध कलात्मक कल्पनांचा वापर केला आहे. पारंपरिकता आणि आकर्षक सजावटीचा सुंदर मेळ साधत त्यांनी गणरायासाठी मनमोहक आरास तयार केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराघरांत विविध पद्धतीने सजावट केली जाते. मात्र, प्रार्थना आणि सृष्टी यांनी कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या कल्पकतेतून केलेली ही सजावट विशेष कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या कलागुणांना आणि मेहनतीला प्रोत्साहन मिळावे, तसेच इतर मुलांनाही आपल्या कलाकौशल्याचा वापर करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या सजावटीसाठी त्यांनी स्वतः कल्पना करून, मेहनत घेत विविध साहित्याचा कल्पकतेने वापर केला. सजावटीमध्ये सौंदर्याबरोबरच पारंपरिकतेची झलकही पाहायला मिळते. कमी साधनांमध्येही स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून सुंदर आरास साकारता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. प्रार्थना आणि सृष्टी यांच्या या उपक्रमातून इतर मुलांनाही स्वतः काहीतरी सर्जनशील करण्याची प्रेरणा मिळू शकते. त्यांच्या मेहनतीची आणि कलागुणांची दखल माध्यमातून घेतली जावी, यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.प्रार्थना आणि सृष्टी यांच्या या कलाकृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Recent Comments