Newsworldmarathi Team: उपाशी पोटी सत्य शोधता येत नाही. बाकी सत्य शिव सुंदर आहे अशा रोमँटिक कल्पनाही लक्जरी व प्रिव्हीलेजचं काम आहे. ज्यांच्या घरी दिमतीला दास्यांची फौज होती अशा नोबेल प्राप्त कविंनी ते सत्य शोधावंही.
महात्मा ज्योतीबा फुलेंनी येथल्या बहुजनांना चला आता सत्यशोधू गड्या.. असला कोणताही व्यक्तीगत कॅथरसिस केला नव्हता. त्यांना स्पष्टपणे माहित होतं की येथील सर्वच जात-धर्म ‘इन्स्टीट्युशन’ आपल्याला केवळ ‘ज्ञान’ किंवा ‘सत्य’ अशा कोणत्या अबस्ट्रॅक गोष्टीपासून अडवून ठेवत नाहीत तर त्यांचा मुख्यहेतू तुम्हाला सत्यापासून नाहीतर ‘सत्तेपासून’ दूर ठेवणं हा आहे. सत्ता ही येथल्या रिसोर्सेसवरील. पाण्यावरील, धान्यावरील होय इथल्या संपत्तीवरील. धंदा, उद्योगावरील.
आता सत्य शोधत बसायचं की सत्ता शोधायची? काय आहे प्रॅगमॅटिक अप्रोच?
सत्य शोधण्याचा संघर्ष कदाचित मोरल पातळ्यावर ज्यांनी शोधायचा त्यांनी शोधावा. पण सत्तेवर आणि थेट इथल्या सगळ्या रिसोर्सेवर क्लेम करायचा असेल तर तुम्हाला मोरलशी चर्चा करायला वेळ नसतो , कारण तुमच्यावर थेट हल्ले होत असतात. ज्या रस्त्यावरून ब्राम्हणेत्तरांना चालयलाही परवानगी नव्हती तीथं जोतीबा घोड्यावर बसून ऐटीत टापात तेबी लाऊडली जायचे. यासाठी जिगरा लागतो.
कारखाने, कंत्राटं, स्टेटमध्ये संबंध, पैसे घालून प्रकाशन, पत्रकं, बॉडीगार्ड, हान की बडीव विषय होता डॉनचा. आता डॉन महात्मा फुलेंची इमेज मचूळ करून त्यावर नाटकं व सगळं हळहळी टाईप साक्षेपीछाप चालंलय. असो.
सत्याचा शोध सत्तेच्या शोधाशिवाय शक्य नाही.. हेच पुढे महामानव बाबासाहेबात दिसत..पाण्याचा लढा म्हणजे काय? रिसोर्सेसवरचा हक्क.. शासनकर्ती जमात म्हणजे काय? सत्तेत वाटा.. मंग कुठं सगळा धुरळा बसल्यावर सत्य म्हणजे बुद्धाच्या दिशेने वैगेरे.. हे फक्त बाबासाहेबांना राईट कळलं होतं. असो.
बहुजन पोरांनी ह्या वैचारिक,साहित्यिक, समतोली, साक्षेपी वैगेरे भंपक ग्रटीफिकेशनच्या नावाखाली भुरट्या युवा विचारवंताच्या, नाटक कंपन्या व लेखक सेलिब्रीटींना दिपून न जाता नीट झक मारली पाहिजे. आरं क्रिप्टो-फिप्टो जग कुठल्याकुठं चाललंय.. आपल्याला हाये ते इकून पुण्याकडं यावं वाटायलंय..अन पोराचं इकडं यगळंच गाणं वाजायलंय.. लेख वाचून कळवतो म्हणे.. दिर्घ लिहतो म्हणे..सिनेमा समिक्षा लिहतो म्हणे. तुम्हाला किंमत नसलेल्या व ज्यातली इॅकॉनॉमी संपलीये त्याच जागा घेण्याचा मोह वाटणं हे काही खरं आणि बरं नाही.
कुणाल तात्या गायकवाड यांच्या फेसबुकहून साभार …


Recent Comments