Newsworldmarathi Pune : इन अससोसिएशन विथ जगदंब आयोजित अदा या महिलांच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 4 वाजता हा फॅशन शो लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या फॅशन शो ला मीडिया पार्टनर न्यूजवर्ल्डमराठी असणार आहे.
अदा फॅशन शो चा यंदाचा चौथा सीजन आहे. या फॅशन शो मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला सहभागी होतात. 100 हुन अधिक महिला या मध्ये सहभागी होतात. या फॅशन शो च्या सर्व बातम्या तुम्हाला न्यूजवर्ल्ड मराठीच्या वेब चॅनलला पाहता येणार आहेत.
महिलांच्या कलागुणांना एक व्यासपीठ निर्माण करून देणे, महिलांना प्रोत्साहन देणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या फॅशन शो ला दरवर्षी महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आम्हाला आनंद होतो.
नीलम शेलार
डायरेक्टर, अदा फॅशन शो…


Recent Comments