Newsworldmarathi Pune: राज्य सरकारच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा अंतर्गत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात तंबाखू मुक्त कार्यालय शपथ विधी आणि “वाचाल तर वाचाल” उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांचे आयोजन कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
“वाचाल तर वाचाल” या उक्तीचा संदर्भ देत, वाचनाचे महत्त्व आणि मोबाईल युगात वाचनाची गरज यावर सहायक आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर, दुपारी ३ वाजता डॉ. दत्ता कोहिनकर लिखित “सुखी जीवनाचा पासवर्ड” या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्त कार्यालय करण्याची शपथही घेतली. या कार्यक्रमास उप अभियंता राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, अधीक्षक श्री. जीवन मराळे, उप अधीक्षक मोनिष बधे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments