Homeमहाराष्ट्रयंदा राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा डिजिटल सर्वे; दलालांची साखळी मोडीत निघणार

यंदा राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा डिजिटल सर्वे; दलालांची साखळी मोडीत निघणार

Newsworldmarathi Mumbai : राज्य शासनाने शेतकऱ्यांना अधिक सुलभरीत्या शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दलालांची साखळी मोडीत निघावी, यासाठी अॅग्रिस्टॅक प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६ मध्ये कृषी उन्नती योजनेंतर्गत अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे. या वर्षात ८७३३.९७ लक्ष निधीच्या वार्षिक कृती आराखड्यातून खर्च होणार आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू-संदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करण्यात येत आहे. त्यामधील हंगामी पिकांचा माहिती संचअंतर्गत डिजिटल पीक सर्वेक्षण (डिजिटल क्रॉप सर्व्हे) राबविण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून शेतीत यांत्रिकीकरणाबरोबरच अनेक बदल होत आहेत. कृषी उन्नती योजनेंतर्गत २०२५-२६ साठी अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सव्हे हा घटक राबविण्यासाठी केंद्र हिस्सा ६० टक्के (५२४०.३८ लाख) आणि राज्य हिस्सा ४० टक्के म्हणजे ३४९३.५९ लाख असा एकूण ८७३३.९७ लाख एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दि. २४ मार्चला आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार २०२५-२६ साठी कृषी उन्नती योजनेंतर्गत अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे या घटकासाठी केंद्र हिस्सा ५२४०.३८ लक्ष आणि राज्य हिस्सा ३४९३.५९ लक्ष निधीच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments