Newsworldmarathi Pune : पुण्यात आज राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी जम्मू-कश्मिरमधील पहलगाममधील हल्ल्याबाबत भाष्य करत सरकार 24 तास कार्यरत असलेल्या वेळापत्रकाची माहिती दिली.

काय म्हणाले नेमकं अजित पवार?
पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते. तसेच त्यांनी त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनचर्या सांगितली. ते म्हणाले. मी पहाटे 4 वाजता उठतो. फिरतो, व्यायाम करतो. पहाटे ४ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. यानतंर 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे, असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला पाहिजेत. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात : प्रकाश आबिटकर
प्रकाश आबिटकर म्हणाले, कामाची पध्दत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर तिथेच रिऍक्ट होतात, असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात असं म्हणत अजित पवारांचं कौतुक केलं. आजही दादांनी परीक्षा घेतली की, सकाळी आठ वाजता ते आले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.


Recent Comments