Homeबातम्या"काँग्रेस खाली करा, तुमचाच फायदा होईल" : बावनकुळेंचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र

“काँग्रेस खाली करा, तुमचाच फायदा होईल” : बावनकुळेंचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र

Newsworldmarathi Mumbai : राज्यातील निवडणुका पार पडल्या असल्या तरीही राजकीय घडामोडींना वेग आला असून, फोडाफोडीचं राजकारण अद्याप सुरूच आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये नेत्यांचं इनकमिंग-आउटगोईंग सुरू असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना थेट काँग्रेस फोडण्याचा कानमंत्र दिला आहे. पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी काँग्रेसला कमकुवत करण्याचे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना दिले.

“तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका. ती जितकी कमी कराल, तितका तुमचाच फायदा आहे. माझं काय होईल याची चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस, मी स्वतः, मुरलीधर मोहोळ आणि अमित शाह आहेत – आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला न्याय मिळणार, काँग्रेसवाल्यांना नाही,” अशा शब्दांत बावनकुळे यांनी पक्षाचे मनोबल वाढवले.

त्यांनी स्पष्ट केले की, भाजप जेव्हा तिकीट वाटप करतो, तेव्हा प्रथम आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करतो आणि नंतरच इतर पक्षांतून आलेल्यांचा विचार केला जातो. काँग्रेसमधील नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये येत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, हे आश्वासनही त्यांनी दिलं.

बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठीही त्यांनी आपल्या भाषणातून ठाम भूमिका घेतल्याचे दिसते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments