Newsworldmarathi Mumbai: मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमासह लग्नाचे नाटक करुन विविध कारणे सांगून उसने घेतलेल्या ५४ लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रेयसीसह तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांची आई मलबार हिल येथे राहते, तर ते पत्नी आणि मुलासोबत अमेरिकेत वास्तव्यास असतात. अनेकदा ते मुंबईत आईला भेटण्यासाठी येत होते. सहा वर्षांपूर्वी ते मुंबईत आले असता ग्रँट रोड येथे गेले होते. तिथेच त्यांची प्रियांका नावाच्या एका वेश्या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली होती.
तिने जवळीक निर्माण करुन प्रेमाचे नाटक सुरु केले होते. त्यानंतर त्यांच्याकडून विविध कारणे सांगून पैशांची मागणी केली होती. त्यांनीही तिला वेळोवेळी उसने पैसे दिले होते. याच दरम्यान ते दोघेही एका भाड्याच्या रुममध्ये लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहात होते. नोव्हेंबर २०२० रोजी तिने त्यांच्याशी दादरच्या एका मंदिरात लग्न केल्याचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता.
त्यानंतरही ती त्यांच्याकडून सतत पैशांची मागणी करत होती. गेल्या सहा वर्षांत तिने त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ५४ लाख रुपये घेतले होते, मात्र उसने घेतलेले पैसे ती परत करत नव्हती. पैशांची मागणी केल्यानंतर तिने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांना धमकी दिली होती. या संपूर्ण कटात प्रियांकाला तिच्या पंधराहून अधिक मित्रांसह सहकाऱ्यांनी मदत केली होती.
Recent Comments