Newsworldmarathi Pune: फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश मिळाले आहे.महाराष्ट्रातील चाटे शिक्षण समुहाचा प्रत्येक विद्यार्थ्यी हा आजच्या दिवसाची वाट आतुरतेने बघत होता.कारण आत्मविश्वास सांगत होता.
चाटे म्हणजे यश आणि यश म्हणजे चाटे हे समीकरण साध्य करण्यासाठीच.आज दहावीचा निकाल लागल्यानंतर चाटे शिक्षण समुहाने काल सातारा रोड चाटे कोचिंग क्लासेस च्या शाखेवरती सत्कार समारंभ आयोजित केला होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे .प्रा.फुलचंद चाटे यांनी अभिनंदन केले, या वेली प्रा विजय बोबडे व ईतर उपस्थित होते.
दुपारी एक वा.निकाल पाहिल्यानंतर चाटेच्या प्रत्येक पालकांच्या चेहर्यावरील स्मितहास्य हेच सांगत होते कि चाटेचा पॅटर्न सक्सेसफुल झाल्यामुळेच आपल्या पाल्याचा निकाल उत्तम लागला आणि स्वप्नाची सुरूवात छान झाली.आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी एस.एस.सी बोर्ड चे उपस्थित गुणवंत विद्यार्थी पर्नवी कुलकर्णी 99.60% तेजस्वी सावंत 98.40% जाधव श्लोक 98.00% यदित काळे 97.80% बर्नवाला त्वीषा 97.80 अनुज तांबे 97.80 शिंदे दुर्वेश मुक्ता देशमुख 97.00% 96.40% दिक्षीत इशान 96.40% फाटक जाई 96.40% तनिष नलगे 95.80 मृनाली गावडे 95.80% सिध्दी तळे 95.60% पियुषा नाईक 95.60% व सी.बी.एस.ई बोर्ड मधून सृष्टी वाडकर 95.08% गार्गी घुटे 94.60% सावरदा ठाकरे 94.40% आयुष इंगळे 94.00% पुजा भोसले 93.60% अनिल कोल्हे 93.40% प्रज्वल जाधव 93.40% ओंकार सोनाकुल 93.00% सिंग सजल 92.80% अहिरराव इशान 92.40% बांगल पृथ्वीराज 92.40% तांबे ॠतुपर्ण 91.20% ताजवे सई 91.20% यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांना अभिनंदन करून दहावी नंतर पुढे काय? याबद्दलही मार्गदर्शन केले.आजचे हे सक्सेस हे एक/दोन दिवसांचे नसून नववी पासूनच शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत आहे व तुमच्यासारख्या पालकांनी दिलेली प्रेरणा आहे.त्यामुळे चाटे पॅटर्न आज फलित ठरला आहे.आजच्या निकालावरती न थांबता लगेच पुढचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अकरावी/बारावी नंतर च्या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला सर्वानी तयारीला लागणे गरजेचे आहे.
कारण दहावीच्या परीक्षेपेक्षा जेईई नीट सीईटी अशा उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धेत्मक परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो.अकरावी व बारावी साठी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घराजवळील आणि ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाते अशाठिकाणी अकरावी सायन्स चा प्रवेश घेणे गरजेचे आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणतात म्हणून नव्हे तर आपल्या आवडीनुसार विषय व दिशा ठरवा.प्रत्येकाला जीवनाच्या प्रवासात पुढे जायचे असेल तर आपण काय करणार आहोत हे अगोदर निश्चित केले पाहीजे.त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखा स्वत: मधील गुण ओळखा सकारात्मक विचार करा.स्वप्न साकार करण्यावर भर द्या वेळ कोणासाठी थांबत नाही.
त्यासाठी परीक्षेच्या काही दिवस अगोदर अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच दोन वर्ष अभ्यास करा प्रत्येक दिवस आपला आहे असं समजून तयारीला लागा यश तुमचेच आहे कारण तुमच्यासोबत चाटे शिक्षण समूह आहे चाटे शिक्षण समूह आहे.राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा व त्याचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि अकरावी बारावी सह जेईई नीट सीईटी एनडीए यासारख्या परीक्षेनंतर देशातील नामांकित संस्था आयआयटी एनआयटी बीआयटी व्हीआयटी आयआयएससी आयआयएसईआर एनआयएसईआर याबाबत ही पालकांना मौलिक मार्गदर्शन केले.चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे सर यांनी फोनद्वारे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
आजच्या सत्कार समारंभ प्रसंगी सातारा रोड बालाजी नगर शाखेवरती पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा.विजय बोबडे सर, प्राचार्य नवनीत राजपाल ,रणजीत जगताप , नामदेव माने शाखा व्यवस्थापक रत्नाकर सोनवणे श्री अनंतराव इंगळे विष्णु पालवे, प्रविण जावळे प्रा.सचिन ढाकणे, महेश ढबाले, गणेश ढाकणे, प्रा.प्रशांत जाधव इतर पुण्यातील सर्व शाखा व्यवस्थापक व आदी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
Recent Comments