Homeक्राईमवैष्णवी हगवणे मृत्युमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो, तर सासऱ्याची मटण पार्टी

वैष्णवी हगवणे मृत्युमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो, तर सासऱ्याची मटण पार्टी

Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना दुसरीकडे तिचे सासरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांचा मटण पार्टीचा व्हिडीओ समोर आल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे.

गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचे बंधू सुशील हगवणे यांना अखेर आज (२३ मे) पहाटे ४.३० वाजता पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पोलिसांचा ससेमिरा चुकवत असताना हे आरोपी नेमके कुठे लपले होते, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी तळेगाव दाभाडे येथील ‘तांबडा पांढरा रस्सा’ हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी मटण जेवणाचा आस्वाद घेतला होता.

या घटनेनंतर काही तासांतच वैष्णवी हगवणेने गळफास घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे मटण पार्टीचा व्हिडीओ आणि तिचा मृत्यू यामध्ये फक्त दोन दिवसांचे अंतर असल्याने समाज माध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

“मुलगी मृत्युमुखी पडते आणि सासरा मटणावर ताव मारतो?” असा सवाल नेटिझन्सकडून विचारला जात आहे.

पोलिसांनी दोघा भावांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरु असून, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात हत्या झाली असल्याचा ठाम आरोप केला आहे. मृत्यूला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आवाज उठत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments