Newsworldmarathi Pune: Monsoon Update : पुण्यात यंदाच्या मे महिन्यातील गत १२ वर्षाच्या पावसाचे विक्रम मोडीत काढले आहेत. १ ते २२ मे दरम्यान ११८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. २०१५ मध्ये १०६ मिमी पाऊसाची नोंद झाली होती. याचा विक्रम आता मोडीत काढला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात मार्च ते मे या उन्हाळी हंगामात सरासरीपेक्षा ५७४ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
दरम्यान, आगामी काही दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याने आणखी उच्चांक होण्याची शक्यता आहे. गुरुवारीही (दि. २२) पाऊस शहर वे परिसर व जिल्हयात पाऊस पडला. पुढील या सहा दिवस ऑरेंज, यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
साधारणतः पुण्यात मे महिन्यात सरासरी ३१.४ मिमी पाऊस पडतो.पावसाला अतिशय अनुकूल वातावरण असल्यामुळे १०० मि.मीहून अधिक पाऊस पडला आहे. शिवाजीनगरमध्ये मे महिन्यात एका दिवसात ४०.५ मिमी, चिंचवडमध्ये १०१ मिमी आणि एनडीए परिसरात १०३ मि.मी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.
तसेच गिरीवन येथे २२ मि.मी, भोर ९.५, तळेगाव ढमढेरे ७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कोरेगाव पार्क, मगरपट्टा, तळेगाव, हवेली, एनडीए, पुरंदर, हडपसर, वडगावशेरी, कुरवंडे, नारायणगाव, बल्लाळवाडी, शिवाजीनगर येथेही हलक्या, मध्यम पावसाची नोंद झाली आहे.
येत्या २३ ते २४ मे ऑरेंज अलर्ट असून विजेच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान, ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार आहे. तसेच २५ ते २८ मे दरम्यान, पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळयात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.


Recent Comments