Homeक्राईमभुगांव येथे बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भुगांव येथे बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या भुगांव परिसरात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुगांव येथील खंडोबा मंदिर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे.

Advertisements

सदर प्रवासी रात्री त्या रस्त्यावरून वाहनातून प्रवास करत असताना अचानक त्याच्या गाडीसमोर बिबट्या आला. या प्रसंगी सजगतेने मोबाईल काढून त्या व्यक्तीने बिबट्याचा संपूर्ण व्हिडीओ शूट केला. व्हिडीओमध्ये बिबट्या वॉल कंपाउंडच्या भिंतीवरून फिरताना स्पष्टपणे दिसत आहे.

Advertisements

अलीकडच्या काही दिवसांत भुगांव परिसरात बिबट्याचे अनेकदा दर्शन झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरी वस्तीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अनुचित घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तात्काळ पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments