Newsworldmarathi Team: आषाढ शुद्ध द्वितीयेला पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा असते. २७ जून २०२५ रोजी सकाळी रथयात्रा सुरू झाली. परंतु, या रथयात्रेला गालबोट लागले आहे. प्रचंड जनसमुदारामुळे येथील व्यवस्था फोल ठरली. प्रचंड गर्दीमुळे तब्बल ६०० जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर रथयात्रा थांबवण्यात आली असून, शनिवारी पुन्हा रथ ओढण्याचे काम सुरू होईल, असे म्हटले जात आहे. मिळालेल्या महितीनुसार, महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे जखमी झाले. आरोग्याच्या समस्यांमुळे ६०० हून अधिक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे वृत्त आहे.


Recent Comments