Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या विनयभंगाच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये बाप आणि लेक अशा नातेसंबंधीत आरोपींचा सहभाग समोर आला असून, सध्या दोघेही फरार आहेत. केज पोलीस ठाण्यात दोघांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना ४ जुलै रोजी दुपारी लव्दुरी गावात घडली. येथे ३० वर्षीय अपंग आणि मतिमंद तरुणी घरात एकटी असताना बाळू जालिंदर कांबळे या व्यक्तीने घरात शिरून तिचा विनयभंग केला. पीडित तरुणीने आरडाओरड केल्यावर तिच्या चुलतीने धाव घेतली आणि आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर पीडितेच्या चुलतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळू कांबळेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
या गंभीर घटनेला अवघे काही तास उलटले असताना दुसरी घटना उघडकीस आली असून, त्यात बाळू कांबळेचा मुलगा आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित घटनेबाबत तपास सुरू असून, पोलिसांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी घटनांमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, स्थानिक नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Recent Comments