Homeपुणेमार्तंड भैरव खंडोबाच्या विवाह सोहळ्याच्या भव्य जिवंत देखाव्यास आमदार हेमंत रासने यांची...

मार्तंड भैरव खंडोबाच्या विवाह सोहळ्याच्या भव्य जिवंत देखाव्यास आमदार हेमंत रासने यांची उपस्थिती

Newsworldmarathi Pune: कसबा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हेमंत रासने यांनी अशोक तरुण मंडळ व संयुक्त अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित “मार्तंड भैरव खंडोबाचा विवाह सोहळा” या भव्य जिवंत देखाव्यास भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली. हा अद्वितीय सांस्कृतिक उत्सव नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

देखाव्यात कलात्मकता, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या भेटीदरम्यान आमदार हेमंत रासने यांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी मंडळाच्या वतीने आमदारांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, तसेच उमेश धुरांडे, छगन भुलाके, राजू परदेशी, माधव साळुंखे, पप्पू कोठारी, सुरेंद्र ठाकूर आणि इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील, भाजप उपाध्यक्ष तुषार पाटील आणि अशोक मित्र मंडळाने केले. मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण सोहळा सुरळीत आणि दिमाखदार पार पडला.

यावेळी नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यक्त केले की, “अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपली परंपरा जपली जाते, आपली मुळे अधिक घट्ट होतात आणि सामाजिक एकोपाही दृढ होतो. हा सोहळा खर्‍या अर्थाने सामूहिक शक्ती व एकीचे दर्शन घडवणारा ठरला असून, नागरिकांच्या मनात कायम स्मरणात राहील.”

मार्तंड भैरव खंडोबाच्या विवाह सोहळ्याचा हा देखावा फक्त धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरला. या भव्य सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आणि पारंपरिक संस्कृतीला नवे अधिष्ठान लाभले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments