Homeपुणेओल्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदार योगेश टिळेकरांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सात लाख ऐंशी...

ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदार योगेश टिळेकरांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सात लाख ऐंशी हजारांचा धनादेश

Newsworldmarathi Pune: राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओल्या दुष्काळाच्या छायेत बळीराजा आणि त्यांचे कुटुंब दडपून गेले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सात लाख ऐंशी हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती देण्यात आला.

हडपसर विधानसभा मतदारसंघ हा स्थलांतरित मजूर, कामगार आणि शेतमजुरांचा मोठा केंद्रबिंदू आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या घराघरांत ओल्या दुष्काळाचे तीव्र स्वरूप स्पष्ट दिसत होते. त्यातूनच तत्काळ आर्थिक मदतीचा निर्णय घेतल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले. “शहराचे शहरपण विसरून गावचे गावपण जपणे, हा आपला सामाजिक धर्म आहे,” असेही ते म्हणाले.

पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका स्पष्ट केली. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर पुणे शहरातील तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आणि व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार टिळेकर यांचे आभार मानले. “शेतकऱ्यांच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, मात्र समाजातील प्रत्येक घटकाने यात हातभार लावणे गरजेचे आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या ग्रामीण भागात ओल्या दुष्काळाचे संकट गडद होत असताना लोकप्रतिनिधी, संस्था आणि नागरिक यांच्या अशा मदतीच्या हातांमुळे शेतकऱ्यांच्या दु:खावर थोडासा मरहम पडेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments