Newsworldmarathi Pune: श्री सद्गुरू जंगली महाराज देवस्थान येथे श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळाच्या वतीने भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवाला यंदा विशेष महत्त्व होते, कारण मंडळाच्या स्थापनेला यंदा ८० वर्षे पूर्ण झाली.
या निमित्ताने मंदिराच्या परिसरात तब्बल १,००० दिव्यांची सजावट करण्यात आली होती. उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघाला आणि भक्तांनी जयघोषात वातावरण भारावून टाकले. भक्तगणांनी सामूहिक आरती, भजन आणि कीर्तनाद्वारे दिवाळी साजरी केली.
मंदिराच्या प्रांगणात सुमारे पाच फूट आकारात श्री सद्गुरू माणिक प्रभू यांचे आकर्षक चित्र दिव्यांच्या सहाय्याने साकारण्यात आले होते. या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दीपोत्सवाचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने पार पडले. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. भजनी मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक भक्तांच्या सहकार्याने हा दिव्य सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.


Recent Comments