Newsworldmaratahi pune: 9 नोव्हेंबर 2011 रोजी 2002 आणि 2004 च्या शैक्षणिक वर्षातील अकरावी व बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्राचार्य अनिल कांबळे, पर्यवेक्षक जीवन इंगळे, शाळा समिती अध्यक्ष तुषार शिंदे, तसेच सेवाजेष्ठ निवृत्त शिक्षक चंद्रकांत गोले, बाळकृष्ण माडगूळकर, बाळाराम धुलप, मानसिंग गायकवाड, पुष्पक कांदळकर आणि माजी विद्यार्थी दलप्रमुख अविनाश खंदारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गखोलीत जाऊन तेथील आठवणी ताज्या केल्या. विद्यार्थीदशेतील अनुभवांवर मनमोकळा संवाद साधताना अनेकांनी आपल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली.
प्राचार्य अनिल कांबळे आणि पर्यवेक्षक जीवन इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जुन्या शाळेशी जोडलेला भावनिक आणि शैक्षणिक बंध अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी योगेश रसाळ, राकेश गुंड, राजेश माने, विकास राऊत, विजय दिंडले, अश्विनी कासार, सारिका अडसूळ, धनश्री आढाव आणि पूजा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उत्साह, आठवणी आणि मैत्रीने भरलेल्या या स्नेहमेळाव्याने सर्वांच्या मनात पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनाचा सुवर्णकाळ उजळला.


Recent Comments