Homeपुणेविकासासोबत सामाजिक सलोख्याचा आदर्श; प्रभाग २२ मध्ये अर्चना तुषार पाटील यांची सर्वधर्मीय...

विकासासोबत सामाजिक सलोख्याचा आदर्श; प्रभाग २२ मध्ये अर्चना तुषार पाटील यांची सर्वधर्मीय एकतेची भूमिका

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायसप्लॉट) च्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी केवळ विकासकामांपुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय एकता जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. प्रभागातील विविध धर्म, समाज आणि घटकांना सोबत घेऊन त्यांनी एकतेचे व आनंदाचे वातावरण निर्माण केले असून, त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सौ. अर्चना पाटील यांनी आजवर राबविलेल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. पुण्याची शान असलेल्या गणेशोत्सवात त्या दरवर्षी अशोक तरुण मंडळ व संयुक्त अण्णाभाऊ साठे मंडळाच्या माध्यमातून भव्य आयोजन करतात. यासोबतच प्रभागातील इतर गणेश मंडळांनाही त्या पाठबळ देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवतात.

त्यांनी आयोजित केलेला नवरात्रोत्सव हा प्रभागातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांची सादरीकरणे तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबविले जातात. ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जातो.

तसेच वीर गोगादेव जन्मोत्सवासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देत त्या उत्साहात सहभाग नोंदवतात. जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा सन्मान राखत ‘आनुज्ञा ओवारना’ कार्यक्रमासाठी अरुण कुमार वैद्य स्टेडियमची जागा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जातो.

“प्रभागातील प्रत्येक नागरिक हे माझे कुटुंब आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने सर्वांना सोबत घेऊन जाणे हेच माझे ध्येय आहे,” असे मत सौ. अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments